प्रकाश झा दिग्दर्शित राजनीती या चित्रपटातून नाना पाटेकर बाहेर पडला आहे. भोपाळमध्ये याचे शुटींग चालले होते. पण या दरम्यान एका प्रसंगावरून या दोघांत वाद झाला. तो विकोपाला गेला आणि नानाने मुंबईत परत जाण्याचा निर्णय घेतला. प्रकाश झा यांनी समजावून सांगूनही नानाचा राग काही गेला नाही. मुंबईत गेल्यानंतर नानाला चुक कळून आली. त्याने नंतर झा यांना फोन करून आपण परतण्यास तयार असल्याचे सांगितले. पण त्यावेळी झा यांनी त्याला न येण्यास सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे शुटींग सुरू होते. आता मध्येच नानाने चित्रपट सोडल्याने मोठे नुकसान होईल. नानाची दृश्ये अन्य कुणा अभिनेत्याला घेऊन चित्रित करावी लागणार आहेत.
नानाचा संताप गेल्या काही दिवसांत कमी झाल्याचे जाणवत होते. पण या प्रसंगाने मात्र नाना तसाच आहे याची खात्री पटली.