मुग्धा-मिथूनचे ब्रेक अप

आपली मराठमोळी मुग्धा गोडसे आणि तिचा मराठमोळा प्रियकर मिथून पुरंदरे यांच्यात दुर्देवाने ब्रेकअप झाले आहे. प्रीती झिंटा-नेस वाडिया, रणबीर कपूर- दीपिका पदुकोण यांच्यानंतर बॉलीवूडमध्ये आता मुग्धा आणि मिथून या जोडप्याचे ब्रेक अप चर्चेत आले आहे. मुग्धा गोडसे माहित असणार्यांना मिथून पुरंदरे फारसा माहित नाही. मिथून गेल्या सात वर्षांपासून मॉडेल म्हणून फॅशन जगतात वावरतो आहे. एका म्युझिक व्हिडीओसाठी २००३ मध्ये ते एकत्र आले होते. त्यानंतर त्यांचे सूर जुळले आणि नवे नाते प्रस्थापित झाले. पण फॅशनला मिळालेल्या यशानंतर मुग्धाच्या नशीबाचे तारे एकदम चमकले आणि मिथूनशी असलेल्या नात्यातला तणाव मात्र वाढला. आता तर मुग्धा ऑल दी बेस्ट, जेल सारख्या चित्रपाटतून व्यस्त झाली आहे. मोठी प्रसिद्धी तिला मिळते आहे. त्या तुलनेत मिथून प्रसिद्धीच्या पडद्याआडच आहे. यामुळेच की काय उभयतांमधील संबंध खूपच ताणले गेले आणि त्यातूनच ते तुटले आहेत. मिथून आणि मुग्धानेही ते मान्य केले आहेत. मुग्धाच्या मते आमच्यात संबंध निर्माण झाले तेव्हा आम्ही बरेच लहान होतो. आता मोठे झालो आहोत. त्यामुळे परस्परांचे गुण-दुर्गुण कळले आहेत. आता हीच वेगळं होण्याची वेळ आहे.'