थ्री इडियट्स हा सिनेमा सुपरहिट होईल, असा जबरदस्त विश्वास आमीर खानला आहे. म्हणूनच की काय त्याने या चित्रपटातील कामाबद्दल एकही पैसा घेतलेला नाही. सिनेमा हिट झाला तरच पैसे घेईन असे त्याने सांगितले आहे. त्यामुळे तो किती पैसे घेईल हेही गुलदस्त्यात आहे. सिनेमा हिट ठरल्यास मोठी रक्कम त्याला मिळेल हेही नक्की आहे.
अमिर खूप स्मार्ट आहे हे यावरून कळून येते. कारण जास्त पैसे मिळण्याची शक्यताही यात आहे. फ्लॉप झाल्यास त्याला काहीच मिळणार नाही, पण इंडस्ट्रीत त्याची मान ताठ होईल. त्याचेच अनुसरण करीना कपूर आणि आर. माधवन यांनीही केले आहे. सिनेमा यशस्वी झाल्यास त्यांना त्यात वाटा मिळणार आहे.
अक्षय कुमारने यातून काही शिकण्याची गरज आहे. अक्की पैसे जास्त घेतो, पण सिनेमा फ्लॉप झाला की अक्की फायद्यात आणि निर्माता मात्र तोट्याच्या गाळात रूततो. ब्ल्यू याचे उदाहरण आहे.