'नटरंग' ही केवळ तमाशा कलावंतांची कथा आणि व्यथा नसून कलेच्या क्षेत्रात तन मन आणि धन ओतून वावरणार्या प्रत्येक मनस्वी कलाकाराचे ते आयुष्य आहे. या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत हे कलेच्या या आंतरिक उर्मी आणि तळमळीतूनच आलेले असल्याने ते प्रेक्षकांना भावते आहे, भिडते आहे. या चित्रपटाला रसिकांचा मिळणारा प्रतिसाद