मुख्य पृष्ठ > मनोरंजन > नाट्य-चित्र > आगामी नाट्य-चित्र > सुखी आयुष्यासाठी 'यू टर्न'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सुखी आयुष्यासाठी 'यू टर्न'
स्त्री-पुरूष नात्यांतील गोड गुंता
WD
जिव्हाळा निर्मित 'यू टर्न' हे नाटक रंगभू‍मीवर येत आहे. आनंद म्हसवेकर लिखीत हे नाटक स्त्री-पुरूषांतील गुंतागुंतीच्या नात्यावर आधारीत आहे. कौटुंबिक तरीही याचे ‍कथानक वेगळ्या धर्तीचे आहे. सशक्त संहीतेबरोबर डॉ. गिरीश ओक, इला भाटे यांच्यासारख्या ताकदीच्या कलाकारांमुळे नाटकाने अपेक्षित उंची गाठली आहे. यानिमित्ताने रंगभूमीवर अनेक दिवसांनी वेगळ्या आशयाने नाटक पहावयास मिळणार आहे.

जीवनाच्या एका वळणावर एकटे पडल्यानंनर होणारी घुसमट आणि अशावेळी सोबती मिळूनही आपल्या मुलांकडून होणारी अवहेलना असा या नाटकाचा धागा आहे. रिटायर्ड मेजर आणि रमाबाई यांच्याभोवती कथानक फिरते. त्या दोघांना अचानक एक कंपनी मिळते. एकटेपणा संपून जातो आणि एका नव्या सोबतीने सुरू होतो पुन्हा एक नवा प्रवास. पुरूष असतो रिटायर्ड मेजर, घटस्फोटीत आणि स्त्री असते एक गृहीणी. रमाबाई, विधवा. दोघांचा स्वभाव मात्र, भिन्न आणि तरीही ते एकमेकांचे चांगले मित्र होतात आणि एकमेकांबरोबर कंपे‍नीयन म्हणून राहण्याच ठरवतात. तिचा मुलगा साहिल अमेरिकेला तर त्याची मुलगी मधु बेंगलोरला असते. मुलांनाही आई-वडिलांच्या एकटेपणाची चिंता असते.

WD
मेजर आणि रमाबाई यांची अनेक बाबतीत टोकाची मते असतात. पत्नीचा तिरस्कार करत असल्याने मेजरला भुतकाळ विसरायचाय तर रमाला भूतकाळाच्या आठवणीवरच जगायचे असते. कारण मि. गोखलेंवर तिचे खूप प्रेम असते. तरीही मेजरशी सगळे विसरण्याचे ती एकप्रकारे करारच करते. फक्त वर्तमानात जगायचे, असे दोघेही ठरवतात. पण, ते शक्य होते कां? खोल मनातल्या आठवणी पुसल्या जाऊ शकत नाहीत, हे दोघांच्याही लक्षात येते. आपले हे नवीन नाते आपली मुलं आनंदान स्विकारतील असे दोघांनाही वाटत असते आणि त्यांचा अपेक्षाभंग होऊ लागतो. मुलांचा विरोध लपविण्याचा दोघेही प्रयत्न करतात पण, हे सत्य एकदिवस बाहेर पडते. आपल्याला समजून न घेणा-या मुलांसाठी आयुष्याचा एकटा प्रवास करायचा की, आपल्याला आवडणा-या व्यक्तीसाठी 'यु टर्न' घ्यायचा? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.

आनंद म्हसवेकर यांनी उत्तम लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची जबाबादारी पार पाडली आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत तर राजन भिसे यांचे नेपथ्य आहे. सुरेश वाडकर, देवकी पंडीत आणि अवधुतने पार्श्वगायन केले आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना असून अरूण कानविंदे यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. निर्माते बाळ वैद्य, नारायण चव्हाण तर किशोर पेठे व प्रकाश नूलकर सूत्रधार आहेत.

संबंधित माहिती शोधा
आणखी
'चिं‍गी' - अपप्रवृत्नीवर प्रकाशझोत
'वळू'च्या टीमचा नवा चित्रपट 'गाभ्रीचा पाऊस'
मराठी चित्रपटसृष्टीत 'धुडगूस'
'सहवास' चित्रपटाचा मुहूर्त
पंजाबी चित्रपटाचा मराठीत रिमेक
'अचानक'चे निगेटिव्ह ‍कटिंग