नाट्य-चित्र गप्पा | आगामी नाट्य-चित्र | ओळख कलावंताची | लिटिल चॅम्प्स | नाट्य-चित्र-समीक्षा | निळू फुले
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » नाट्य-चित्र » आगामी नाट्य-चित्र » अमिताभचा 'विहिर' फिल्म फेस्टीव्हलमध्ये!
 
film preview
PR
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रॉडक्शन हाऊसने अर्थात ''एबीकॉर्प. लि'' नं आता मराठीमध्ये चित्रपट निर्मिती केली आहे. या कंपनीची निर्मिती असलेला 'विहीर' हा मराठी चित्रपट आता पूर्ण झाला असून त्याचा वर्ल्ड प्रिमिअर साऊथ कोरियातील पुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

जागतिक चित्रपट महोत्सवांत मराठी चित्रपट सहभागी होणे हे आता फारसं नवं नाही. पण आपला वर्ल्ड प्रिमियर अशा जागतिक सोहळ्यांमध्ये करुन स्पर्धेतही नॉमिनेशन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे भाग्य अमिताभ बच्चन यांच्या उमेश कुलकर्णी दिग्दर्शित विहीर या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाच्या वाट्‍याला आलंय. गिरीश कुलकर्णी आणि सती भावे यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाला ''वळू'' फेम उमेश कुलकर्णी यांचं दिग्दर्शन आहे. मदन देवधर, अलोक राजवाडे, रेणुका दफ्तरदार, डॉ. मोहन आगाशे, ज्योती सुभाष, सुलभा देशपांडे, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष आणि अश्विनी गिरी अशी भली मोठी स्टारकास्ट 'विहीर'मध्ये आहे.

preview
PR
पुसान चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक कॅटेगिरीमध्ये प्रदर्शित होणारा विहीर हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. पुसानबरोबरच लंडन फिल्म फेस्टीव्हलमध्येही 'विहीर' वर्ल्ड सिनेमा या कॅटेगिरीसाठी निवडला गेला आहे. हा महोत्सव 15 ते 28 ऑक्टोबरदरम्यान लंडनमध्ये होणार आहे.

जीवनाच्या अत्यंत बिकट वळणावर उभ्या असलेल्या, पौगंडावस्थेतल्या दोन भावांची कथा ''विहीर''मध्ये चितारण्यात आली आहे. वळूमुळे लोकांच्या स्मरणात असलेल्या उभेश कुलकर्णी यांचं दिग्दर्शन ''विहीर'' ला असलं तरी वळूपेक्षा खूप वेगळ्या धाटणीचा असा हा चित्रपट असणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन पहिल्यांदाच मराठीमध्ये निर्मिती करत असल्यानं एक वेगळं ग्लॅमर या चित्रपटाला मिळालं आहे.
संबंधित माहिती शोधा