मुख्य पृष्ठ > मनोरंजन > नाट्य-चित्र > नाट्य-चित्र-समीक्षा > 'कशाला उद्याची बात'चे रिमिक्स
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'कशाला उद्याची बात'चे रिमिक्स

natya chitra
PR
कोणे एकेकाळी मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांची भ्रष्ट नक्कल करतात, विशेषत: गाजलेल्या गाण्यांचे विडंबन करतात असा आरोप केला जायचा. मात्र अलीकडच्या काळात मराठी चित्रपटाचे स्वरूप आमुलाग्र बदलले. मराठी चित्रपटाची म्हणून एक स्वतंत्र अशी ओळख नव्याने निर्माण झाली. सध्या तर मराठीतील अविस्मरणीय गाण्यांच्या स्मृती नव्या चित्रपटांच्या माध्यमातून नव्याने जागविल्या जात आहते 'एलिक्झर लॉजिकल थिंकर मुव्हिज् प्रा. लि.' च्या संतोष कोल्हे दिग्दर्शित ''मेड इन चायना'' ह्या मराठीमध्ये येऊ घातलेल्या नव्या चित्रपटानेही एका गाजलेल्या अजरामर चित्रपटाची आणि त्यातील अनोख्या गाण्याची याद नव्याने ताजी केलेली आहे. हा चित्रपट आहे, शांताराम बापूंचा 'माणूस' आणि शांता हुबळीकरांवर चित्रित झालेलं ते गीत म्हणजे 'कशाला उद्याची बात....' !

संतोष कोल्हे - कमल खेतान निर्मित आणि संतोष कोल्हे दिग्दर्शित 'मेड इन चायना' ह्या चित्रपटात माणूस मधील 'कशाला उद्याची बात' हे गीत समाविष्ट केलेले असून लोकप्रिय गायिका सुनिधी चौहानने ते गायले आहे. अजनबी ह्या मालिकेद्वारे तसेच कोयला, बादशाह व पाटर्नर इत्यादी सुपरहिट चित्रपटांतून आपली यशस्वी वाटचाल करणारी हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपशिखाने उमेश जाधवच्या कोरियोग्राफीखाली ते पेश केलेले आहे.

मूळ चित्रपटातील ह्या गाण्यालाही तसा प्रणयाचा रंग होताच. 'मेड इन चायना' तील ह्या गीताची मध्यवर्ती कल्पनाही प्रणयरंगाचीच असून, गाण्याच्या चित्रीकरणासाठी अंधेरी पूर्व येथील क्लिक निक्सनच्या आवारात खास सेट उभारला गेला होता. दीपशिखाने ह्या गीतावर दिलखेचक नृत्य पेश केले आहे. सोबत मिलिंद गुणाजी यांनीही या गाण्यात धमाल केली आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे मूळ गीतातील 'कशाला उद्याची बात' हा मुखडा तेवढा ह्या गाण्यासाठी वापरण्यात आलेला असून बाकीची शब्दरचना रोशनी भालवणकर यांनी केलेली आहे. 'नार नवेली तुफानी, अदा है तेरे हटके, कमाल तेरे झटके गं पोरी, कमाल तरे झटके' सारखी यातली शब्दरचना तरुणाईची बोली बोलते. ह्या शब्दरचनेला तितकीच दिमाखदार चाल बांधली आहे ती, स्वरुप आनंद यांनी !

'मेड इन चायना' या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीचे सूत्रे आशिष पाटील व प्रसाद मिरासदार यांनी सांभाळली असून एकनाथ कदम यांनी कला विभागाचे काम पाहिले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. ''मेड इन चायना'' मध्ये संदीप कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, मधुरा वेलणकर, पुजा नायक, शिल्पा नवलकर, कांचन पगारे, उत्तरा बावकर आणि डॉ. शरद भुताडिया यांच्या खास भुमिका आहेत.
संबंधित माहिती शोधा
आणखी
गलगले निघाले- चार आण्याची कोंबडी...
गोची प्रेमाची आणि सामान्याचीही...
सनई-चौघडे: एका निराळ्या लग्नाची गोष्ट...
धमाल वात्रटपट एकावर तीन
`कदाचित` नव्हे नक्कीच पहा !
अखेरचा सवाल' व्हिसीडीवर