चित्रपटांमध्ये मी केवळ विनोदी भूमिका करतो, हे खरे आहे. माझा चेहरा आणि शरीरयष्ठी त्यासाठी समर्पक असल्याने मला तशा भूमिका मिळत असतात. पण, माझ्या चेहर्याकडे मुळीच जाऊ नका. मला जर गंभीर भूमिका मिळाली तर ती देखील तितक्याच ताकदीने वठविण्यासाठी मी समर्थ आहे, असे उद्गार प्रख्यात मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव याने काढले.
प्रेक्षकांचा कल सध्या विनोदी नाटक आणि विनोदी चित्रपटांकडेच अधिक आहे. तीन तास मनोरंजन व्हावे एवढ्यासाठीच ते चित्रपटगृहात येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना जे हवे असते तेच आम्हाला द्यावे लागते. तेच मी देखील करीत आहे. कारण, मी एक कलाकार आहे. 'इरादा पक्का' च्या मुहूर्तासाठी नागपुरात आला असता तो पत्रकारांशी बोलत होता.विदर्भातील माझी ही दुसरी भेट आहे. यापूर्वी 'शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे आलो होतो, असेही त्याने सांगितले.