अभिनेत्री रेणुका शहाणे आता मराठीत दिग्दर्शकीय पदार्पण करत असून हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळी गाजलेला अभिनेता जॅकी श्रॉफ या निमित्ताने मराठीत येत आहे. रेणुका आपली आई शांता गोखले यांच्या 'रिटा वेलिणकर' या कादंबरीवर आधारीत मराठी चित्रपट काढत असून दिग्दर्शनाची धुराही तिनेच सांभाळली आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत असून रेणुका तिची मैत्रिण आहे. याशिवाय सुहासिनी मुळे, मोहन आगाशे, सई ताम्हणकर हे अन्य दमदार कलावंतही यात आहेत.