नाट्य-चित्र गप्पा | आगामी नाट्य-चित्र | ओळख कलावंताची | लिटिल चॅम्प्स | नाट्य-चित्र-समीक्षा | निळू फुले
मुख्य पृष्ठ मनोरंजन » नाट्य-चित्र » नाट्य-चित्र गप्पा » 'रिटा' मध्ये पुरुषांची अवहेलना नाही - रेणूका शहाणे
नाट्य-चित्र गप्पा
'रिटा' हा महिलाप्रधान चित्रपट असला तरी त्या चित्रपटात पुरुषांची अवहेलना केली नाही, त्यांना कमी लेखले नाही, त्यांनाही सारखाच न्याय दिला आहे असे प्रतिपादन चित्रपटाच्या दिग्दर्शिका व अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी डोंबिवलीत केले.

श्रीकला संस्कार व सुयश नाटयसंस्था यांच्या संयुक्त विमाने 'रिटा' या महिलाप्रधान चित्रपटाच्या रसावलोकन प्रसंगी घेतलेल्या खास मुलाखतीत त्या बोलत होत्या. चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशी व रेणूका शहाणे यांची मुलाखत निवेदिका उत्तरा मोने यांनी घेतली. याप्रसंगी व्यासपिठावर सुधाताई साठे, आबासाहेब पटवारी उपस्थित होते. कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी चित्रपटातील काही अंश दाखविण्यात आले.

अभिनय करत असताना दिग्दर्शन कुणाकडे शिकलात? असा प्रश्न विचारला असता शहाणे म्हणाल्या की आजपर्यंत अनेक दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली भूमिका केल्या. त्या प्रत्येक दिग्दर्शकाकडून काही ना काही शिकल. पण जास्त प्रभाव विजयाबाई मेहतांचा असल्याचे मान्य करुन त्यांचा वक्तशिरपणा भावला व त्यांची प्रत्येक गोष्ट लिखित होती व त्याप्रमाणे अंमलबजावणी होत होती. त्यांची छाप जास्त असल्याचे त्या म्हणाल्या.

पल्लवी जोशी १४ वर्षानंतर अभिनय क्षेत्रात आल्या त्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या मी अभिनय करते याचाच मला विसर पडला होता. तसेच अभिनयाचा सराव सुटला होता. अचानक रेणूकाने चित्रपटात काम करणार का? म्हणून विचारले तेव्हा मीच गोंधळून गेले. मला वाटले तिला पाहुणी कलाकार म्हणून मी हवी आहे. त्यामुळे मी पटकन हो म्हटले. तेव्हा तिने संपूर्ण भूमिका 'रिटा' करायची असल्याचे सांगितले तेव्हा मी गोंधळून गेले. काय बोलावे हेच सुचेना. कारण मी अभिनय करते हेच विसरले होते. पण घरच्यांनी मला प्रोत्साहन दिले असेही त्या म्हणाल्या. 'रिटा' स्वाभीमानी, कर्तबगार मुलीची गोष्ट असून या चित्रपटामुळे स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो असेही त्या म्हणाल्या. तर शहाणे यांनी आईच्या (शांता गोखले) यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट काढण्याचे ठरवले व त्यासाठी जीव तोडून मेहनत केल्याचे त्यांनी सांगितले.