नाट्य-चित्र गप्पा | आगामी नाट्य-चित्र | ओळख कलावंताची | लिटिल चॅम्प्स | नाट्य-चित्र-समीक्षा | निळू फुले
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » नाट्य-चित्र » नाट्य-चित्र गप्पा » अमेरिकेने परेश मोकाशींना व्हिसा नाकारला
Feedback Print Bookmark and Share
 
WD
WD
ऑस्करला पाठविण्यात आलेल्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांना अमेरिकेला जाण्याचा व्हिसा अमेरिकी दूतावासाने नाकारला आहे. मोकाशी यांना आपण ओळखत नाही आणि त्यांचा चित्रपट ऑस्करला पाठविण्यात आला आहे, याची आपल्याला माहिती नाही, असे स्पष्टीकरण दूतावासाने दिले आहे.

यासंदर्भात मोकाशी यांच्याशी संपर्क साधला असता, ' मी अमेरिकी दूतावासाला दोष देऊ इच्छित नाही, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की सहजगत्या ओळखता येईल इतका लोकप्रिय माझा चेहरा नाही. त्यामुळे मी कोण आहे हे दूतावासाच्या अधिकार्‍यांना माहित असण्याची शक्यता नव्हती. मी हा चित्रपट बनविला आहे आणि तो ऑस्करला पाठविण्यासाठी निवडला गेला आहे. याची कागदपत्रेही माझ्याकडे नव्हती.

हा चित्रपट ऑस्करला पाठविण्यात आला आहे, याची कागदपत्रे मोकाशींपर्यंत पोहोचलेली नाहीत. युटिव्हीच्या निर्मात्यांकडे त्यांनी सर्व कागदपत्रे यापूर्वीच दिलेली आहेत. अमेरिकेतून आलेली सगळी कागदपत्रेही त्यांनी या चित्रपटाच्या निर्मात्या यु टिव्हीकडे सोपवली आहेत.

मोकाशी यांना दोन नोव्हेंबरपर्यंत लॉस एंजिल्समध्ये उपस्थित रहाणे आवश्यक आहे. या प्रकरणात यु टिव्हीने हस्तक्षेप केल्यानंतर अमेरिकी वाणिज्य दूतावासाने मोकाशी यांना व्हिसा देण्याचे मान्य केले आहे.
संबंधित माहिती शोधा