फिलिपाईन्स डायरी | माझा महाराष्ट्र | देश-विदेश
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » भटकंती » माझा महाराष्ट्र » सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर
Feedback Print Bookmark and Share
 
भीमाशंकर अभयारण्यातील काही महत्वाचे पॉइंटस
सनसेट पॉंईंट : या ठिकाणाहून खाली पाहिल्यानंतर हिरव्या रंगाच्या अनेक छटांनी मुक्त उधळण केलेला माथेरानपर्यंतचा मनमोहक परिसर डोळ्याचे पारणे फेडतो. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा काही भाग आणि प्रसिध्द मच्छिंद्रगड (हाजी मलंग) इथून दिसतो. या ठिकाणाहून सुर्यास्ताचे दृश्य नयन मनोहर दिसते.

नागफणी पॉंईंट : अंजनीमाता मंदिराच्या मागच्या बाजूने वर चढून गेल्यानंतर नागफणी पॉंईंट आहे. वर गेल्यानंतर दिसणारे दृश्य माणसाला जागच्या जागी खिळवून ठेवते. श्वास रोखून धरायला लावणार्‍या सहयाद्री पर्वताच्या रांगा, खाली दरीत दिसणारे पेण आणि तुंगीपदर हे किल्ले आणि माथेरानाचा रम्य परिसर, खाली दरीत दिसणारी गांव , शेतं, माणसं, नदी, जलाशय सगळं काही चित्रात असल्याप्रमाणे चिमुकलं दिसत. हे संगळ दृश्य मन मोहून टाकतं.

वनस्पती पाँईट : या ठिकाणी वनस्पती देवी आहे. पूर्वी सह्याद्रीच्या पूर्व पठारावरची मंडळी रोगराई झाली की, वाजत-गाजत येथे येत असत. देवीची पूजा करुन आपला रोग खाली कोकणात सोडला अशी भावना ते ठेवत. या ठिकाणी वेगवेगळ्या रोगांवर `ईलाज` करणार्‍या वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत.

भीमाशंकर
MH News
MHNEWS
पेशवाई घंट
भिमाशंकर या हेमाडपंथी मंदीराच्या गाभार्‍याचा जिर्णोध्दार करण्याचे काम पेशवाईत नाना फडणीस यांनी आरंभिले होते, पण दुर्देवाने त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नीने या गाभार्‍याचे काम पूर्ण केले. वसईच्या युध्दात पेशवाईने जिंकलेली एक महाकाय घंटा पेशव्यांच्या नावाने या ठिकाणी अजूनही मंदिराच्या बाहेरच्या चबुतर्‍यावर ठेवली आहे.

भिमाशंकर नावामागची कथ
बारा पवित्र ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात सहयाद्रीच्या कुशीत भिमाशंकर या नावाने प्रसिध्द आहे. त्रिपुरासुर नावाचा एक दैत्य होता. तो देव-मानवांवर अग्निवर्षाव करी. त्याच्या या उत्पाती सामर्थ्यापुढे सगळे देव हतबल झाले आणि त्यांनी महादेवाला शरण जावून त्रिपुरासुराच्या वधाची याचना केली. शंभुमहादेवाने बर्‍याच प्रयत्नानंतर पाशुपत मंत्राने बाण तयार करुन या दैत्याचा वध केला. हा वध करण्यासाठी महादेवाला बरेच श्रम करावे लागले. त्यामुळे त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. भीमक नावाचा राजा या ठिकाणी जप करत असे, तो त्या प्रसंगी तिथे आला आणि ''या धर्मधारांची पुण्यपावन नदी होऊ दे'' असा वर मागितला. या त्याच्या वरामुळे या स्थानाला भिमाशंकर नाव पडले आणि तेथून उगम पावलेल्या नदीला 'भिमा' हे नाव पडले अशी पुराणकथा आहे.

कसे जाल?
भीमाशंकरपासून सर्वांत जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन पुणे आहे. पुण्यापासून भीमाशंकर 125 कि.मी. अंतरावर आहे. पुणे-नाशिक महामार्गाने मंचरपर्यंत येऊन डाव्या बाजूच्या वळणाने भीमाशंकरकडे वळावे लागते. मंचर-भिमाशंकर हे अंतर 65 कि.मी. एवढे आहे. शिवाजीनगर बसस्थानक (पुणे) येथून पुणे- भिमाशंकर बसेस आहेत.

मुंबईहून माळशेज घाटमार्गे भिमाशंकरला जाता येते. मुंबई-कल्याण-मुरबाड-जुन्नर-भीमाशंकर असा हा 260 कि.मी. अंतराचा प्रवास आहे. चेंबूर, ठाणे, कल्याण या बसस्थानकांवरुन भीमाशंकरकडे जाणार्‍या बसेस सुटतात.
(साभार- महान्यूज)
 
संबंधित माहिती शोधा