नैसर्गिक अनुभूतीचे निसर्ग अभ्यास केंद्र

पाटणादेवी
MH News
MHNEWS
निसर्गसौंदर्य नेहमीच मानवाला भुरळ घालीत असते. मनाला मोहिनी घालणार्‍या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटायला कोणाला आवडणार नाही. वर्षा ऋतुचे आगमन होताच आकाश नभांनी भरुन येते अन् क्षणार्धात धरती जलधारांनी ओलीचिंब होते. पावसाच्या आगमनाने सर्वत्र एक आल्हाददायक वातावरणच निर्माण होते. पावसाने धरतीवर जणू जीवन फुलते.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तालुक्यातील पाटणादेवी अभयारण्यातील निसर्ग अभ्यास केंद्र सध्या पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे. येथील डोंगरावरुन अवखळपणे कोसळणारे धबधबे, डोळयात न सामावणारे निसर्ग सौंदर्य हे निसर्गप्रेमी जनतेसाठी एक पर्वणीच आहे आणि ही पर्वणी अनुभवयाला मिळावी म्हणून मी सुध्दा पाटणादेवी परिसराकडे सहजच आकर्षित झालो. चाळीसगाव उपमाहिती केंद्राला जिल्हा माहिती अधिकार्‍यांबरोबर भेट देण्याचे ठरल्याने च्या या निसर्ग अभ्यास केंद्रातही जाण्याचे ठरले.

हिरव्यागार वनराईतून चालत आम्ही येथून जवळच असणार्‍या सुप्रसिध्द पाटणादेवीच्या पुरातन अशा मंदिरात पोहोचलो. त्यानंतर आम्ही अभ्यासकेंद्रात गेलो. या निसर्गरम्य केंद्रात पाटणादेवी परिसरातील वैविध्यपूर्ण अशी माहिती मिळत असल्याने येथे पर्यटकांचा ओघ नेहमीच सुरु असतो. पाटणादेवी परिसरातील धार्मिक स्थळे, औषधी वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी अभयारण्याची वैशिष्ट्ये, जलप्रवाह अशी विविध प्रकारची माहिती याठिकाणी उपलब्ध करुन दिलेली आहे.

येथील निसर्ग अभ्यासकेंद्रात मूर्ती, छायाचित्र आणि चलचित्र अशा प्रकारात ही माहिती देण्यात आली आहे तर गणितज्ञ भास्कराचार्य यांच्यासंबंधी भिंतीवर कथारुपाने माहिती दिली आहे. ही माहिती वाचताना वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. निसर्गाच्या सानिध्यात भान हरपून आपण रमून जातो.

या अभ्यास केंद्रात सध्या तीन खोल्यामध्ये अतिशय सुबकतेने चित्र व चलचित्रांच्या सहाय्याने पाटणादेवी परिसराची माहिती साकारलेली आहे. या केंद्रात एका दगडावर अगदी हुबेहुब बिबटया वाघाचा पुतळा साकारण्यात आला आहे. त्याच्या भोवती लहान बालके अतिशय उत्साहाने खेळत होते. त्यांच्यातील उत्साह पाहून आम्हालाही प्रेरणा मिळत होती. तेवढ्यात आम्हाला काही पशु-पक्षांचे आवाज ऐकू आले. आमच्यासारखेच काही पर्यटक त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनाही आमच्यासारखेच या आवाजाबाबत कुतूहल होते. तितक्यात अभ्यासकेंद्रातील एका कर्मचार्‍याने या केंद्रात नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने रानावनातील पशु पक्षांचे आवाज ध्वनीमुद्रीत करुन ते या ठिकाणी वाजविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती दिली. या सुविधेमुळे पर्यटकांना आपण प्रत्यक्ष जंगलात असल्याचा भास होत असतो.

येथे भेट देणार्‍या पर्यटकांना निसर्ग अभ्यास केंद्राबरोबरच निसर्गाच्या अनोख्या सौंदर्याचा एक आगळा वेगळा आनंद अनुभवायला मिळतो. याच केंद्राच्या प्रांगणात विविध औषधी वृक्ष असून पर्यटकांना त्याची माहिती मिळावी म्हणून फलकावर सविस्तर अशी माहिती दिल्याचे दिसून आले. अशा या निसर्गरम्य परिसरातील या अनोख्या निसर्ग अभ्यासकेंद्राला भेट दिल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळाला.
(महान्यूज)

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

भटकंती

ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार किल्ले धारूर

घाटावर वसलेलं हे शहर असल्यामुळे गावाचं आरोग्य चांगलं आहे. खवा आणि सीताफळाची ही महत्त्वाची ...

'वन विहार' - थ्री इन वन राष्ट्रीयपार्क

राष्ट्रीय उद्यान म्हटले की, डोळ्यासमोर येते ते दूरपर्यंत विस्तारलेले घनदाट जंगल, हिरवीगार ...

येवा सिंधुदूर्गात स्वागत असा

क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सान्निध्यात चंदेरी वाळुच्या किनार्‍यावर ...

नरवीर तानाजीचा 'सिंहगड'

तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा किल्ला म्हणजे सिंहगड. पुणे शहराच्या ...

Widgets Magazine

Widgets Magazine

भटकंती

ट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा

doodhsagar fall

कॅसलरॉक ते दूधसागर धबधबा हा एक महत्त्वाचा ट्रेकिंग रूट आहे. आपल्या परिसरातील बहुतेक ट्रेकर्सना ...

विश्रामगड अर्था पट्टा किल्ला

visharam garh

मुंबई-कसाराजवळ पट्टेवाडी हे लहान खेडेगाव आहे. तेथे पट्टा किल्ला आहे. यालाच विश्रामगड असे म्हणतात. ...

नवीनतम

‘बिग बी’ सोबत झळकणार अक्षरा आणि धनुष

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीग बी अमिताभ बच्चन आणि निर्माता आर. बाल्की असे समीकरण तयार ...

ट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा

कॅसलरॉक ते दूधसागर धबधबा हा एक महत्त्वाचा ट्रेकिंग रूट आहे. आपल्या परिसरातील बहुतेक ट्रेकर्सना ...

Widgets Magazine