testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

dress
Last Modified बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (15:27 IST)
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत मिरविण्यापेक्षा रोजच्या पेहरावालाच नवरात्रीचा टच देण्याकडे यंदा तरुणींचा कल आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत ऑफिस, कॉलेज असे दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याने या ठिकाणी जाताना भरजरी कपड्यांपेक्षा रोजच्या कपड्यांतच वैविध्य आणत उत्सव आणि काम यांचा मेळ पोशाखातून साधला जात आहे.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा एकापाठोपाठ येणार्‍या सणांसाठी विविध पोशाखांची आखणी केली जाते. नवरात्रीत येणार्‍या नवरंगासाठी कपड्यांची जुळवाजुळव होते. घागरा, चनिया चोली, भरजरी साड्या, त्यावर खुलणारे दागिने अशा वेशभूषा केलेल्या तरुणींनी दांडिया फुलून गेल्याचे चित्र काही काळापूर्वी दिसत असले तरी यंदा मात्र रोजच्याच पेहरावाला तरुणींनी पसंती दिली आहे. नवरात्रीतील नऊ रंगांचे पोशाख परिधान करणे सोपे असले तरी साध्या पोशाखात ते रंग वापरले जातात. नोकरी, कॉलेज अशा रोजच्या ठिकाणी प्रवास करणार्‍या महिलांना पारंपरिक पोशाख करणे शक्य नसते. त्यामुळे कुर्ती, टॉप, चुडीदार या रोजच्या वापरातील पोशाखांकडेच महिलांचा कल आहे. महिलांची ही गरज लक्षात घेत यंदा बाजारातही अशाच पद्धतीच्या पोशाखांनी गर्दी केली आहे. यामध्ये लाल, पिवळा, निळा अशा गडद रंगांचे कुर्ती, त्यावरील आरशांची नक्षी, हँडप्रिंट केलेले टॉप यांच्यात वैविध्य आहे. पारंपरिक पोशाखांच्या तुलनेत कमी खर्चिक असणारे हे प्रकार कामाच्या ठिकाणी घालणे सहज शक्य आहे, तसेच नवरात्रीनंतरही ते वापरता येत असल्याने महिलांची अशा कपड्यांना मागणी आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

तयारी करा देशातील ४५ बँकामधील महाभारती प्रक्रिया होणार सुरु ...

national news
इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल म्हणजेच आयबीपीएसने ग्रामीण बँकांमध्ये विविध पदांसाठी जाहिरात ...

प्रेगनेंसी दरम्यान कारल्याचे सेवन केले पाहिजे की नाही, दूर ...

national news
गर्भावस्थेत स्त्रिया आपल्या खाण्यापिण्याबद्दल फारच कॉन्शियस होऊन जातात. काय खायला पाहिजे ...

ऑफिसचा पहिला दिवस!

national news
ऑफिस जॉइन करायचा पहिला दिवस असेल तर उत्सुकता आणि भीतीसुद्धा मनात असते. सहकार्‍यांशी आपले ...

घरच्याघरी तयार करा गुलाब पिस्ता आइसक्रीम

national news
दुधाला गरम करण्यास ठेवा, हलके गरम झाल्यावर त्यातून 1 कप दूध वेगळे काढा. या 1 कप दुधात ...

5 महत्वाचे हेअर हॅक्स

national news
उंच पोनीटेल बांधून घ्या. पोनी खालून बाहेरच्या बाजूला फोल्ड करत वरपर्यंत घेऊन जा आणि मोठं ...