1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन

सौंदर्याचा मुकूट केस

-सौ. योगिता लोखंडे

शॅम्पू कोंडा तेल
NDND
स्त्री असो वा पुरुष सौंदर्यात केसांचे अत्यंत महत्व आहे. केस जणू सौंदर्याचा मुकूटच आहे. केस लांबसडक असोत किंवा लहान पण ते निरोगी असले तरच त्यांचे सौंदर्य कायम राहते. त्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांची योग्य ती निगा राखणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी काही उपाय ‍खाली दिले आहेत.

आपल्या आहारात प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश असावा, जसे दही, मध, अंडी इ. तसेच दिवसातून भरपूर पाणी प्यावे.
आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा केसांना शँम्पू लावावा. शक्यतो हर्बल शँम्पूचा वापर करावा. परंतू शँम्पू करण्याच्या 1 तास आधी केसांच्या मुळाशी कॅस्टर ऑइल, ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेलाने मालिश करावी. तेल थोडेसे कोमट करून त्याने मालिश करावी.

NDND
आजकाल केसांना रंगीत करण्याची फॅशन आहे. परंतु, हे रंग केसांना हानी पोहचवतात. त्यात असलेली रसायने केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात.

केसांना चमक आणि मऊपणा येण्यासाठी केसांना मेंदी लावावी. मेंदी उत्तम कंडिशनरचे काम करते. जर फक्त कंडिशनिंगसाठी मेंदी लावायची असेल तर 2 चमचे दही, 2 चमचे ऑलिव्ह ऑइल, 4 लवंग बारीक करुन त्याची पूड मेंदीमध्ये भिजवा. ही मेंदी रात्रभर लोखंडाच्या भांड्यात भिजू द्या, नंतर मेंदी केसांना लावण्यापूर्वी त्यात एक अंडे फेटून मिसळा आणि मग केसांच्या मुळापासून तर टोकापर्यंत ती मेंदी ब्रशच्या सहाय्याने केसांना व्यवस्थित लावा. कमीत कमी 30 ते 40 मिनिटांपर्यंत मेंदी वाळू द्या आणि नंतर कोमट पाण्याने ती धुऊन टाका. मेंदी धुताना शँम्पूचा वापर करू नका. नंतर केस व्यवस्थित वाळवून आपण वापरत असलेल्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करा, आणि दुसर्‍या दिवशी शॅम्पू लावा.

NDND
केस पांढरे असतील आणि त्यांना रंग येऊ द्यायचा असल्यास मेंदी भिजवताना त्यात 2 चमचे कॉफी मिसळा आणि जास्तीत जास्त 2 तास मेंदी केसांना लावलेली असू द्या. 2 तासापेक्षा अधिक वेळ मेंदी केसांवर ठेवू नये. त्यामुळे केस मऊ होण्याऐवजी रुक्ष होतात.

तेलकट केसांना नियमित शॅम्पू करावा अन्यथा ते चिकट होतात आणि केसात कोंडा होतो. तसेच रुक्ष केसांचीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, वेळोवेळी त्यांना तेलाने मालिश करणे आवश्यक आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा