केसाने गळा कापू नये म्हणून....
केस सौंदर्यात आतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. पण कधी कधी हे केसच गळा कापतात. केस पांढरे होऊ लागले, झडू लागले की सौंदर्यात बाधा येते. त्यामुळे त्यांचे सौंदर्य राखण्यासाठी त्यांना मजबूत ठेवण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरू शकतील.
योग
योग शरीरासाठी आवश्यक आहे. योगामुळे रक्ताभिसरण चांगले होते. तन आणि मन या दोन्ही स्फुर्ती उत्पन्न होते. शिवाय घाम निघाल्याने त्वचेची छिद्रे स्वच्छ होतात. नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीरासाठी आवश्यक असणारा योग केसांसाठीही लाभदायक आहे. शीर्षासन किंवा हलासनामुळे केस मजबूत होतात. ही आसने नियमित केल्याने केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतात.
मसाज थेरेपी
आठवड्यातून किमान दोनवेळा तरी केसांना मॉलिश करावी. त्यामुळे केस मजबूत होतात. केसांसाठी ई जीवनसत्व असणारे तेल वापरल्यास उत्तम. याशिवाय आवळा, मेंदी, बदाम, लिंबू किंवा खोबरेल तेल काही थेंब घेऊन दहा मिनिटे केसांना चांगली मॉलिश करा. विशेषतः त्यांच्या मुळांकडे जास्त लक्ष द्या. त्यासाठी हाताची बोटे थोडा दाब देऊन डोक्यावरून गोलाकार फिरवा. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारून केसांना व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. याशिवाय खाली झुकून केसांतून कंगवा फिरवल्यानेही रक्ताभिसरण सुधारते.
ध्यान
ताणतणाव हे केस पांढरे होण्याचे प्रमुख कारण आहे. शिवाय त्यामुळे केस वेगाने झडतात. हे रोखण्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे. रोज शांतचित्ताने डोळे बंद करून गडबड, गोंधळ नसेल अशा ठिकाणी बसावे. ओमचा उच्चार करावा. शरीर सैल सोडावे. श्वासही हळूवारपणे घ्यावा. श्वास सोडताना ओम म्हणावे. असे रोज केल्यास मनाची एकाग्रता वाढते. त्वचेची छिद्रे उघडून त्याद्वारे ताजी हवा शरीरात येते. यामुळे ताण तणाव दूर होऊन केसांचे पोषण होते.
एरोमाथेरेपी
एरोमाथेरेपी केसांसाठी पोषक आहे. विशेषतः झडणारे केस रोखण्याचे काम या थेरेपीद्वारे चांगल्या पद्धतीने केले जाते. शिवाय केसांचे आयुष्य वाढविण्याचे कामही ही थेरेपी करते. देवदार लाकूड, जांभूळ, होहोवा तेल, लॅव्हेंडर, लिंबू, जोजोबा यापैकी कोणत्याही तेलाचे थेंब ऑलिव्ह तेल किंवा खोबरेल तेलात मिसळा. हे मिश्रण पाण्यात मिसळा आणि डोक्यावर थापा. त्यानंतर डोक्यावर चांगली मॉलिश करा. गरम टॉवेलने केस दोन ते तीन तास चांगले बांधून ठेवा. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात. दाट आणइ काळ्या केसांसाठी जिरेनियम किंवा रोजवूड तेल उपयुक्त आहे. पांढऱ्या केसांसाठी चमेली किंवा लिंबाचे तेल उपयुक्त आहे.