उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी !
|
दररोज अंघोळीच्या आधी शरीराच्या उघड्या भागाला दही लावून 10 मिनिटापर्यंत तसेच राहू द्या. मग अंघोळ करा.
जवसाचे तेल व सिरका सम प्रमाणात घेऊन अंघोळीच्या एक तास आधी लावल्याने त्वचा उजळेल.
एक छोट्या काकडीचा रस, अर्धा चमचा ग्लिसरीन व एक चमचा गुलाबाणी घेऊन त्वचेवर लावल्याने त्वचा नरम पडते.
हलव्याचे दाणे दुधात वाटून त्यात साय व लिंबाचा रस मिसळून चेहर्याला व अंगाला लावल्याने गरमीत फायदेशीर ठरतो.
एक चमचा बेसन, थोडीशी हळद, एक चमचा दूध व एक चमचा गुलाब पाणी घेऊन रोज लावल्याने त्वचा उजळते.
चंदन वाटून त्यात काही थेंब गुलाबपाणी मिसळून लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो.
त्वचा उन्हामुळे रापली असल्यास काकडी, टोमॅटो आणि लिंबाचा रस सम मात्रेत घेऊन लेप करून घ्यावे व वाळल्यावर परत लावावे, नंतर धुऊन टाकावे.
एक चमचा लोणी आणि एक चमचा पाणी मिसळून फेटून घ्या. उन्हामुळे जळलेल्या त्वचेवर लावल्याने आराम पडेल.
