* आवळ्याचा मुरब्बा रोज खावा व गाजराचा रस प्यावा.
तुलशीचे मुळ बारीक करून पाण्यासोबत पिल्याने लाभ होतो. तुळशीचे मुळ उपलब्ध नसतील तर तुळशीच्या मंजुळा घ्याव्यात.
लसनाच्या दोन पाकोळ्या बारीक करून पाण्यासोबत गिळूण घ्याव्यात. थोड्या वेळानंतर गाजराचा रस प्यावा.
दमा-
एक पिकलेली केळी सालट्यांसहीत भाजावे. नंतर त्यावरील सालटे काढून टाकून केळीचे तुकडे करावे. त्यावर मिर्यांची पावडर टाकून गरमागरम दमा रुग्णाला खाऊ घातल्यानेलाभ होतो.
खोकला-
एका पिकलेल्या केळीत आठ आखे मिरे भरुन द्यावेत. नंतर त्यावर पुन्हा सालटे लाऊन खुल्या जागी ठेऊन द्या. प्रात:विर्धीला जाण्यापूर्वी मिरे काढून खावे. त्यानंतर केळीचे सेवन करावे. काही दिवस नियमित केळी खाल्याने खोकला कमी कमी होऊन कायमचा बंद होतो.