तजेलदार त्वचेसाठी आहार
|
त्वचेच्या समस्या अन्य कारणांमुळेही उद्भवू शकतात. हार्मोन्स परिवर्तन, जेनेटिक प्रॉम्बेम, आणि गर्भावस्थेचा काळ देखील त्वचेवर परिणाम घडवतो. पण 70% पेक्षा जास्त परिस्थितीत शुष्क त्वचेसाठी चुकीचा आहारच कारणीभूत ठरतो. वेगवेगळ्या त्वचेसाठी आहारही वेगळा हवा. पण त्वचेच्या आरोग्यासाठी खालील काही बाबी मात्र सर्वांसाठीच आवश्यक आहेत.
* जास्तीत-जास्त पाणी प्या. पाणी त्वचेसाठी चांगले औषध आहे. पाण्यामुळे आपण ताजेतवाने होतो त्याचबरोबर त्वचाही उजळते.
* आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेसाठी जीवनसत्वाची आवश्यकता असते. काही जीवनसत्वाची नावे खालीलप्रमाणे. ही जीवनसत्वे त्वचा तजेलदार राखण्यास मदत करतात.
1. जीवनसत्व सी: हे रसदार फळांमध्ये असते, संत्रे, मोसंबी...
2. जीवनसत्व ए: याचे प्रमुख स्रोत आहेत पपई, संत्रे...
3. जीवनसत्व बी: हे फळांसोबतच पत्तेदार भाज्यांमध्ये आढळते.
4. जीवनसत्व इ: हे शेंगदाणे, आणि अन्य कडधान्यांमध्ये आढळते.
त्वचा तजेलदार करणे अवघड नाही. फक्त त्यासाठी आहाराकडे लक्ष द्यायला हवे. वरील घटकांचा समावेश आहारात केल्यास तेही तुम्ही साध्य कराल.
