मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > लेख
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
खवय्यांना होऊ शकतो कँन्सर

chat
ND
मस्त खमंग आणि चटपटीत खाणे प्रत्येकालाच आवडत असते. काहीजण तर दररोज असे मसालेदार पदार्थ खातात.अशा खवय्यांना वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

धूम्रपानाने कर्करोग होण्याची जितकी दाट शक्यता आहे, त्याच प्रमाणात केवळ अती मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही कर्करोग होण्याची दाट शक्यता असल्याचा त्यांचा दावा आहे.

चिंतेची बाब म्हणजे अती मसालेदार पदार्थांच्या सेवनाने कर्करोग झाल्यास, त्याचे निदान अंतिम टप्प्यातच केले जाऊ शकते. त्यामुळे खाताना जरा जपून खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मॅक्स हेल्थ केअर सेंटरच्या डॉक्टर अमित भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये भारतात अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अती मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेवर त्याचा वाईट परिणाम होतो आणि यामुळे पोटाच्या कर्करोग होण्याची शक्यता बळावते.

सतत ऍसिडिटी होणे, पाटात दुखणे ही त्याची लक्षणं असू शकतात, त्यामुळे रुग्णांनी घरच्याघरी उपचार करण्यापेक्षा त्वरित डॉक्टरांकडे जावे असा सल्लाही भार्गव यांनी दिला आहे.
आणखी
आरोग्यदायी बेलफळ
तजेलदार त्वचेसाठी आहार
हसा आणि हसवा
आला उन्हाळा, तब्बेत सांभाळा!
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या!
आहार घ्या आयुर्वेदानुसार