1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

अशी घ्या ''ब्युटी स्लिप''!

अशी घ्या 'ब्युटी स्लिप'!
ND
संतुलित जेवणाचा संबंध चांगल्या झोपेशी आहे आणि चांगली झोप लागल्यास आपोआप सौंदर्यही मिळते. तुम्हाला ब्युटी स्लिप हवी असल्यास हे जरूर करून पाहा.

झोप न येणं हा सुद्धा एक आजार आहे. या आजाराने व्यक्ती नीट झोपू शकत नाही. तो थोड्याशा आवाजाने किंवा प्रकाशाने झोप मोडते. त्यामुळे त्याचा शरीरावर विपरीत प्रभाव पडतो. चांगल्या आरोग्यासाठी भरपूर झोप होणे आवश्यक आहे. काही लोक झोप न आल्यामुळे झोपेच्या गोळ्या घेतात, पण त्या गोळ्या विपरीत परिणाम घडवितात.

झोपेमुळे शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो. प्रत्येक व्यक्तीसाठी कमीत कमी 7-8 तास झोपणे आवश्यक आहे. चांगली झोप झाल्याने मनुष्य प्रसन्न राहतो त्याचबरोबर त्याच्यात स्फूर्तीही वाढते.

झोप न येण्याची कारणे
मानसिक तणाव, संताप, चिंतन, उत्तेजना, धूम्रपान, चहा-कॉफीचे जास्त सेवन, गरजेनुसार कमी किंवा जास्त जेवण किंवा जास्त झालेले जेवण.

निद्रानाशात आहाराची भूमिका
निद्रानाशात आहाराची महत्त्वपूर्ण भूमिका असते. नवीन संशोधनानुसार, संतुलित आहाराचे सेवन केल्याने निद्रानाशाची समस्या बर्‍यापैकी कमी केली जाऊ शकते, असे आढळले आहे.

हे टाळावे वा कमी खावे
जेवणात जास्त प्रमाणात साखर, मैदा, जड जेवण, जास्त प्रमाणात चहा-कॉफी, चॉकलेट, शीत पेय, अल्कोहोल इत्यादीचे सेवन करणे टाळावे.

हे जेवणात घ्या
आपल्या जेवणात कडधान्ये, दही, दूध, ताजे फळ, ताज्या हिरव्या भाज्या, सलाड इत्यादींचा समावेश करावा.

निद्रानाशापासून असा बचाव करा.
* आपली दिनचर्या नियमित ठेवावी. झोपायची व उठायची वेळ निर्धारित करावी व त्याच वेळेवर जागावे व झोपावे.
* तणावाला दूर करण्याचा प्रयत्न करावा.
* रोज व्यायाम करावा
* रात्रीच्या वेळेस जास्त जड जेवण टाळावे. जेवणानंतर थोड्यावेळ शतपावली करावी.
* झोपण्या अगोदर 1 ग्लास कोंमट दुधात मध घालून प्यावे.
* झोपताना सुती व आरामदायक कपडे घालावे.
* डाव्या कुशीवर झोपावे व उंच उशी घेणे टाळावे.
* झोपताना मधुर संगीत ऐकावे किंवा एखादे मासिक वाचावी.
* अंघोळ करून झोपल्याने चांगली झोप येते.
* अंथरूणावर हलक्या रंगाची चादर अंथरावी व स्वच्छेतेकडे लक्ष ठेवावे.

झोप ही निसर्गाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. म्हणून निद्रानाशाला गांभीर्याने घेऊन त्याची कारणे दूर करण्याचा प्रयत्न करावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा