रसदार संत्र्यात पोषक घटक भरपूर आहेत. संत्रे रुचकर आणि पौष्टिक आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम भरपूर असते. शिवाय सोडियम, पोटेशियम, मॅग्नेशियम, कॉपर, सल्फर आणि क्लोरीन असते. संत्र्यावरच्या आवरणात सर्वांत जास्त कॅल्शियम असते. म्हणूनच संत्र्याचे सेवन सालासकट करायला पाहिजे. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातल्या रक्ताला क्षारमय बनवते आणि विकारांना दूर करते.
संत्र्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाचक आहे. ते व्यक्तीला चपळ आणि दीर्घायू बनविते. नियमित संत्री खाल्ल्यास बिगरमोसमी ताप, आणि रक्तस्त्राव आदी विकार होत नाहीत. संत्र्याचा रस प्रत्येक वयाच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतो. टायफाइडसह इतर आजारांवर संत्रे औषधी आहे. ते शरीराला संसर्गजन्य रोगांपासून लढायची शक्ती देऊन रक्तशुद्धीचे कार्य करते. संत्र्यामुळे पोटातील कृमी नष्ट होऊन आतड्यांना आराम मिळतो.
संत्रे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-सी चा चांगला स्रोत आहे. परिणामी हाडासंदर्भातील रोग दूर होण्यास मदत होते. संत्र्याचा रस नियमित प्यायल्यास लट्ठपणावर नियंत्रण ठेवता येते. नवजात मुलाला संत्र्याचा रस फायदेशीर असतो. वयानुसार रोज 15 ते 120 मिलीलीटरपर्यंत संत्र्याचा रस घेतला तर स्कर्वी रोगही दूर होतो.
|