1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

फिटनेसाठी ''यौगिक डाएट''

फिटनेसाठी यौगिक डाएट
NDND
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फिट ठेवणे फारच जिकिरीचे झाले आहे. तंदुरूस्त रहाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रोज सकाळी एरोबिक्स, जॉगिंग, सायकलिंग केले जात आहे. याशिवाय 'यौगिक डाएट'वर भर देत आहेत.

यौगिक डाएटचा नवीन फंडा जन्माला आला आहे. यौगिक डाइटमध्ये विशेषत: पेय पदार्थ येतात. ते मुलत: नैसर्गिक असतात. त्याच्या सेवनाने आपल्या शरीरावर कुठलाच विपरित परिणाम होत नाही. भारतीय आयुर्वेदात काही फळ व कंद मुळाचा उल्लेख आला आहे. त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीरच नव्हे तर मनही तंदुरूस्त राहते. उन्हाळ्याच्या दिवसात त्याचे सेवन शरीराला लाभदायी ठरत असते.

* कैरीचे पन्हे-
कैरीचे पन्हे हे भारतीय पेय असून ते उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देते. जुलाब होत असतील तर पन्हे रामबाण औषध आहे. कैरीचे पाणी, चिमुट भर मीठ, साखर किंवा गुळ यांचे मिश्रण शरीराला लोह प्रदान करते. उन्हाळ्याच्या दिवसात दररोज कैरीचे पन्हे सेवन केल्याने ऊर्जा मिळते व थकवा क्षणात नाहीसा होतो. शरीरातील कॅलरीज भरून करण्यासाठी पन्हे फायदेशीर असते.

* चंदनाचे सरबत-
शरीर व डोके शांत ठेवण्यासाठी चंदनाचे सरबत उत्तम औषध आहे. आपल्या देवघराच्या पूजेतील चंदन पाण्यात उगाळून त्याची पेस्ट दोन कप पाण्यात टाकून त्यात साखर, एक लहान चमचा इलायची टाकून चांगले उकळून घ्या. ते गार झाल्यानंतर त्यात लिंबू पिळून सेवन केल्याने स्वत:ला फिट राखता येते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा