मुलांचे वजन जन्मत: मुलांचे वजन सामान्यतः: अडीच ते तीन किलो असते. हे वजन मूल पंधरा महिन्याचा होईस्तोवर दुप्पट व्हायला हवे. आईचे दूध आवश्यक प्रमाणात मिळाल्याने पाच-सहा महिन्याच्या मुलाचे वजन दुप्पट होते. मूल सहा महिन्याचे झाल्यावर त्याच्या आहाराकडे दुर्लक्ष व्हायला लागते. त्यामुळे मुलांचे वजन वर्षभरात जन्माच्या वेळेपेक्षा तिप्पट होण्याचा आनंद क्वचितच पालकांना घेता येतो.
पहिल्या वाढदिवसानंतर वजन वाढण्याची गती कमी व्हायला लागते. दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलांचे वजन जन्माच्या वेळेपेक्षा चौपट वाढते. (म्हणजे जन्माच्या वेळी अडीच तर दोन वर्षात दहा किलो). त्यानंतर दरवर्षी एक किलो वजन वाढते. |