स्मरणशक्ति आणि बुद्धि वाढविण्यासाठी आवळा हे उत्तम औषध आहे. आवळे खाल्ल्याने दृष्टि सुधारते आणि कांती सतेज बनते. आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा घ्यावा. आठपंधरा दिवसांत आम्लपित्त थांबते. ताजा आवळा नसताना पूडसुद्धा चालते.