स्नायू दुखणे * गरम पाण्यात मीठ टाकून दुखावलेला भाग शेकावा. * दुखावलेल्या भागास रॉकेल लावून वर फडके गुंडाळावे. * टर्पेंटाइन तेल, मेंथॉल लावावे. * कडुलिंबाच्या बियांचे तेल दुखणार्या भागास चोळावे.
अंग दुखून ताप येणे, पाडसे-फ्ल्यू * तुळशीची पाने 5/6, बेलाची पाने 3/4, सुंठ छोटा तुकडा, खडीसाखरेचा 1 खडा, थोडे जिरे, धने, पारिजातकाची 4/5 पाने, गवती चहाची 2/3 पाने, 2/3 भांडी पाणी घालून काढा करून उकळत ठेवावा. 1 भांडे काढा ठेवावा. रात्री गरमागरम पिऊन पांघरूण घेऊन झोपावे. दरदरून घाम येईल. आराम वाटेल. * त्रिभुवन कीर्तिच्या 2 गोळ्या तुळशीच्या पानाबरोबर घ्याव्या. दिवसातून 3 वेळा 4 दिवस घ्याव्यात. काळ्या मनुका खाऊन मग पाणी प्यावे.
ताप येऊन डोके दुखते तेव्हा * वेखंडाची कांडी पाण्यात उगाळून तिचा डोक्याला लेप द्यावा. लहान मुलांच्या अंगाला लेप लावावा.
संधिवात * वडाची पाने गरम करून दुखर्या अवयवाला तेल लावून, पाने गच्च फडक्याने रात्री बांधून ठेवावी. सांधे सैल पडतात. * काळ्या तुळशीच्या पानांची वाफ दुखर्या अवयवाला देणे.
सर्दी * विड्याच्या पानांचा रस 2 चमचे व मध 1 चमचा मिसळून सकाळी व सायंकाळी घ्यावा.
ताप * नारळाचे पाणी, साखरपाणी, गोड ताक, विड्याच्या पानांचा रस 1 चमचा, आले पाव चमचा, मध 1 चमचा देणे. * गुलाब पाणी, थंड पाणी व मीठ यांची पांढरी पट्टी कपाळावर ठेवावी.
|