आजचे जीवन धावपळीचे झाले आहे.आहार आणि जीवनपध्दतीत झालेल्या बदलांमुळे अनेक नवीन शारिरीक आणि मानसिक व्याधी जन्माला येत आहेत.यामुळे व्यायम आणि योगाचे महत्व वाढत आहे. सध्याच्या काळात 'फिट'राहणे सर्वात महत्वाचे ठरत आहे. यामुळेच विविध योग शिबिर, जीममध्ये गर्दी वाढू लागली आहे.आपल्या दैनंदिन जीवनात पाच सूत्री कलमाची अंमलबजावणी केल्यास आपण सहज 'फिट'राहून आपले आरोग्य उत्तम ठेवू शकू. * जेवण: जेवण अमृतासमान आहे.जेवणामुळेच आपल्याला शक्ती मिळते.यामुळे जेवण नेहमी योग्य वेळी,योग्य प्रमाणात घ्यावे.जास्त किंवा कमी जेवण शरीरासाठी हानीकारक आहे. * झोप : स्वस्थ शरीरासाठी चांगली झोप आवश्यक आहे.झोपेची कमतरता किंवा जास्त झोपेमुळे तुमच्या शरीरात आजार येवू शकतात.यामुळे शरीरास आवश्यक आहे तेवढीच झोप घ्यावी.रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी सर्वात चांगले आहे.* व्यायम : आजच्या धावपळीच्या जीवनात कष्टाची कामे कमी झाली आहे. यामुळे व्यायमाचे महत्व वाढत आहे.तुमच्या आवडीनुसार कोणताही व्यायम नियमित करणे आवश्यक आहे.योग असो किंवा शारिरीक व्यायम यांच्यासाठी काही वेळ तुम्ही राखूनच ठेवावा.* व्यसनरहीत : व्यसनरहीत राहणे सर्वात महत्वाचे आहे. तंबाखू,सिगारेट,विडी,मद्य यासारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती आपल्या आरोग्याचे स्वता:च शत्रू असतात. या व्यसनांचे परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागतात.* मर्यादा : जीवानात प्रत्येक कार्यासाठी एक निश्चित मर्यादा हवी.जर तुम्ही तुमच्या मर्यादांचा उल्लंघन केले नाही तर इतर कोणी तुमच्या सीमेत प्रवेश करु शकत नाही. मग ते कोणतेही आजार का असेना? यामुळे मर्यादाचे पालन आवश्यक आहे. |