Widgets Magazine
 

आलं व सुंठीतील फरक समजून घ्या!

adrak
WD
हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे.

आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.

आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते.

पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा.

आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्लयाने फायदा होतो.

आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साकर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो.

सुंठीवाचून खोकला गेला ही म्हणं असली तरी खरोखरचा खोकला हा सुंठीशिवाय जात नाही हेच त्यातून स्पष्ट होते.

आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्‍यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.

सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.

याशिवाय सुंठही खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते व खोकलाही कमी होतो. सुंठीचे अनेक फायदे असले तरी सुंठ ही पित्ताचे व त्वचेचे विकार असणार्‍यांनी वापरू नये. तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात वापरू नये.

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

आरोग्य

सर्दीपुढे आता 'नाक' टेकू नका

एवढीशी ती सर्दी पण पार माणसाचे 'पाणी पाणी' करून टाकते. पण थांबा आता अमेरिकेत झालेल्या ...

डाळिंबाचा रस बुद्धिवर्धकासाठी

लहान मुलांना नियमित डाळिंबाचा रस दिल्यास जंत कमी होतात. शिवाय ते बुद्धिवर्धकही आहे.

गाय, म्हैसचे दूध मुलांना घ्यावे लागते

गाय, म्हैस किंवा बाहेरेचे दूध मुलांना घ्यावे लागते तेव्हा काही वेळा त्यांना ते पचत नाही. ...

लहान मुलांना आकडी येते त्यावेळी

लहान मुलांना आकडी येते त्यावेळी कांदा ठेचून त्यांच्या नाकाशी धरावा. कांद्याचा दर्प नाकात

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

आज-काल

'ए मेरे वतन के लोगों...'

लतादीदींसमवेत १ लाख लोक गाणार?

इंग्लिश बोला, पैसे कमवा

भाषिक अस्मितेच्या नावाने राजकीय नेत्यांनी कितीही बोंबा मारल्या तरी कमाईच्या बाबतीत विश्वभाषा ...

नवीनतम

फार्मसी क्षेत्रात करिअर

फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त ...

Try This : पाकसल्ला

भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा ...

Widgets Magazine