एके दिवशी राजा विक्रमादित्यच्या दरबारारात एक ब्राह्मण आला होता. राजा विक्रमाने त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. ब्राह्मण म्हणाला, ''मान सरोवरमध्ये सूर्योदय होताना एक खांब प्रगट होतो. सूर्य जसा माथ्यावर येतो तसा तो खांब ही मोठा होतो व सूर्याची उष्णता जशी कमी होत जाते, तसा तो खांब लहान होतो. सूर्यास्ताच्या वेळी तर तो पाण्यात विलीन होऊन जातो. समुद्राला सोडून सूर्याची उष्णता सार्या ब्रह्माण्डामध्ये कोणीच सहन करू शकत नाही, असा सूर्याचा गर्व आहे, असे त्या ब्राह्मणाने राजाचा सांगितले.