परीक्षा
|
लवकर आली रिक्षा
आई-बाबा-ताई
सर्वांनी केली घाई
'नीट दे ध्यान
उत्तर लिही छान
नको मारू उड्या
नको काढू खोड्या
तरच होशील पास
नाहीतर नापास
मग संपेल शाळा
ना खडू ना फळा'
छे बुवा..... मला काऽऽऽऽऽऽऽऽऽ ही कळत नाही
|
नापास म्हणजे काय?
'मग संपेल शाळा',
म्हंजे कायमची संपली की काय?'
