Widgets Magazine
 

गॉडफादरचा जन्म

मणिरत्नमच्या दयावान पासून, रामगोपाल वर्माच्या सत्या, सरकारपर्यंत जगभरातील अंडरवर्ल्डपटांना प्रेरणा देणार्‍या साहित्यकृतीचा जनक मारियो पुझो याचा आज स्मृतीदिन. गॉडफादर या कादंबरीद्वारे आणि तिच्यावर निघालेल्या तीन चित्रपटांद्वारे जगभर प्रसिद्गीस पावलेल्या या प्रतिभावंताने ही कादंबरी प्रकाशित होईपर्यंत कोणत्याही डॉनला प्रत्यक्षात पाहिलेलं नव्हतं, हे कुणालाही सांगून खरं वाटणार नाही. याचं कारण पुझोने चितारलेली डॉन व्हिटो कॉर्लिऑनची व्यक्तिरेखा.

अमेरिकेत स्थलांतरित होऊन आलेल्या आई-बापापोटी पुझो जन्मला. पुझोला सहा भावंडं होती. न्यू-यॉर्कमधील स्थलांतरितांच्या हेल्स कीचन या वस्तीत पुझोचं बालपण गेलं. त्याचे वडील रेल्वे ट्रॅकमन होते. बालपणातच कधीतरी लागलेला वाचनाचा नाद आणि वाचनालयांशी जवळिक पुझोला लेखनाची प्रेरणा देऊन गेली. पुझो विशीत असतानाच दुसरं महायुद्ध भडकलं आणि अमेरिकी हवाई दलातर्फे त्याची रवानगी पूर्व आशिया आणि नंतर जर्मनीत झाली.

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर त्याने जर्मनीतच थांबण्याचा निर्णय घेतला. तो तेथे हवाई दलाच्या जनसंपर्काची जबाबदारी सांभाळू लागला. तेथे काही काळ घालवून तो अमेरिकेत परतला आणि न्यू यॉर्कच्या न्यू स्कुल फॉर सोशल रिसर्चमध्ये आणि नंतर कोलंबिया विद्यापीठात त्याने अध्ययन केले. याच काळात तो साहित्य व सर्जनशील लेखनाचे अध्यापन करू लागला. १९४६ मध्ये त्याने एरिका ब्रोस्के या तरूणीशी तो विवाहबद्ध झाला. १९५० साली पुझोची पहिली कथा अमेरिकन व्हॅनगार्ड या नियतकालिकात दी लास्ट क्रिसमस या नावाने प्रकाशित झाली. १९५५ मध्ये डार्क एरिना ही त्याची पहिली कादंबरी त्याच्या वयाच्या ३५ व्या वर्षी प्रकाशित झाली. त्यात एक माजी अमेरिकन सैनिक आणि एक जर्मन तरूणी यांच्यातील प्रेमकथा, ज्यात सूडाचेही मिश्रण होते, चितारण्यात आली होती.

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

मराठी साहित्य

मराठी कविता : तहान

असा काल्पनिक संभोग किती करावा वासनेनं कल्पनेशी अशानं स्वप्न

मुठीतलं चांदणं

काही तरी लिहावसं वाटतं काही तरी करावंसं वाटतं तुझ्यासोबत फार बोलावंसं

खूप वाटतं

खूप वाटतं, तुझं बेगान दु:ख एकदातरी ऐकावं

मराठी कविता : प्रश्न

घायाळ सूर आळवू कसे दुखडे नवे सजवू कसे ?

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

आज-काल

'ए मेरे वतन के लोगों...'

लतादीदींसमवेत १ लाख लोक गाणार?

इंग्लिश बोला, पैसे कमवा

भाषिक अस्मितेच्या नावाने राजकीय नेत्यांनी कितीही बोंबा मारल्या तरी कमाईच्या बाबतीत विश्वभाषा ...

नवीनतम

औषधांनी आयुष्य वाढले

सध्या मनुष्यप्राण्याला वृद्धापकाळावर औषध शोधण्याचे वेड लागले आहे. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी ...

हिरव्या टोमॅटोमुळे स्नायू होतात मजबूत

एकेकाळी टोमॅटोला विषारी फळ समजून त्यापासून लोक दूर राहात होते. मात्र आता टोमॅटो जगभरातील लोकांच्या ...

Widgets Magazine