लागणारे जिन्नस : एक किलो चिकन, एक किलो बासमती तांदूळ, एक पाव रिफाइंड तेल, अर्धा किलो चिरलेले टमाटे, एक कप दही, 10 ते 15 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), पाच-पाच ग्रॅम दालचिनी, वेलची, लवंग, एक मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, दोन लीटर पाणी, चवीनुसार मीठ.
तयार करावयाची कृती : प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. चिकनचे तुकडे करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात कांदा टाकून परता. नंतर हिरवी मिरची, वेलची दाणे, दालचिनी, लवंग टाकून भाजून घ्या.
कांदा परतून झाल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट टाका. नंतर त्यात टमाटे टाका. चिकन, दही आणि चवीप्रमाणे मीठ टाका. चिकन थोडे शिजू द्या.
नंतर तांदूळ आणि आवश्यकतेनुसार दोन लीटर पाणी टाकून शिजू द्या. सर्व मिश्रण व्यवस्थित हालवून घ्या. झाकण लावून तांदूळ शिजेपर्यंत शिजवून घ्या. गरमा-गरम चिकन बिर्याणी सर्व्ह करा.
|