लागणारे जिन्नस : 500 ग्रॅम तंदुरी चिकन, 250 ग्रॅम चिरलेला कांदा, 15 ग्रॅम कडिपत्ता, 100 ग्रॅम बारीक चिरलेले टमाटे, 40 ग्रॅम पेपर कॉर्न पावडर, 50 मिली. विनेगर, कोथिंबीर, जिरे पावडर, गरम मसाला, मोहरी, वेलची, दालचिनी, 200 ग्रॅम तेल, चवीनुसार मीठ.
करावयाची कृती : चिकन स्वच्छ करून कापून घ्या. नंतर तंदूरमध्ये दहा मिनिटे शिजवा. एका पॅनमध्ये तेल गरम करा. आता त्यात कडी पत्ता, मोहरी, वेलची, दालचिनी, कापलेले टमाटे आणि कांदा टाकून व्यवस्थित भाजून घ्या. मिरे पूड, पेपर कॉर्न पावडर, कोथिंबीर, जिरे, गरम मसाला, मीठ टाकून हालवून घ्या.
दोन मिनिटानंतर त्यात तंदुरी चिकनचे पीस टाकून वीस मिनिटे कमी आचेवर शिजू द्या. विनेगर टाकून एक मिनिट शिजू द्या आणि गरमा-गरम सर्व्ह करा.
|