लागणारे जिन्नस: 250 ग्रॅम मासे, आले, 6-7 हिरवी मिरची, 7-8 कांदे, 1 चमचा लाल तिखट, एक चुटकी हळद, कोथिंबीर, कडीपत्ता, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर, टमाट्याची प्युरी, अर्धा लीटर नारळाचे दूध.
करावयाची कृती: मिरची, आले, कांदे, तिखट, कोथिंबीर वाटून घ्या. मासे धुऊन तयार केलेल्या मसाल्यात मिळवा. दहा ते पंधरा मिनिटे राहू द्या. एका कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात कडीपत्ता आणि कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्या. त्यात मसाला लावलेले मासे टाका. मासे शिजेपर्यंत भाजून घ्या.
दुसर्या कढईत नारळाचे दूध घेऊन मंद आचेवर दूध अर्धे होईपर्यंत उकळवा. नंतर त्यात तयार केलेले मासे टाकून व्यवस्थित हालवा. मासे दुधात पूर्ण शिजल्यावर त्यात आमचूर पावडर टाकून गॅसवरून उतरवून घ्या. तयार आहे चटपटी फिश करी.
भातासोबत गरमागरम फिश करी सर्व्ह करा.
|