लागणारे जिन्नस: 500 ग्रॅम मैदा, 4-5 अंडे, एक कप तूप, 1 चमचा मिरे पूड, चवीनुसार मीठ.
करावयाची कृती: मैदा गाळून तूप आणि मीठ घालून पोळ्यांच्या कणकेप्रमाणे मळून घ्या. मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घेऊन त्रिकोणी पराठे तयार करून घ्या.
पराठे शेकत असताना एक अंडे फोडून तव्यावर पराठ्यांच्या किनार्याने टाका. सोबतच मीठ आणि मीरेपूड पराठ्यांवर टाका. गरमा-गरम तयार स्वादिष्ट पराठा सॉससोबत सर्व्ह करा.
|