साहित्य : कांदे, 2 चमचे मोहरीची डाळ, पाव चमचा मेथी, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, 1/2 चमचा मीठ, अर्धी वाटी लिंबाचा रस, हिंग, अर्धी वाटी तेल.
कृती : 1 वाटीभर उभा चिरलेला कांदा द्यावा. मेथ्या बदामी रंगावर तळून घेऊन, मेथ्या व मोहरी वाटून घ्यावी. फोडणी करून गार करून घ्यावी. सर्व मिश्रण एकत्र करून, त्यात कांद्याच्या फोडी व लिंबाचा रस घालून एकसारखे कालवावे व बरणीत भरून ठेवावे.
|