साहित्य : गहू, मीठ, हिंग कृती : गहू पाच दिवस पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते वाटून, त्यांचे सत्त्व काढावे. जितके सत्त्व असेल, तितकेच पाणी चुलीवर ठेवावे. त्यात हिंग व मीठ अंदाजाने घालावे. उकळी आल्यावर त्यात वरील सत्त्व ओतावे. एका हाताने ओतावे व दुसर्या हाताने ढवळावे. गोळी होऊ देऊ नये. चांगले शिजल्यावर ते शेवपात्रात घालून प्लॅस्टिकच्या कागदावर कुरडया घालाव्यात आणि वाळवून भरून ठेवाव्यात.
|