मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > शाकाहारी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
वांगी भात  Search similar articles
-स्मिता

साहित्य : 2 वाट्या बासमती तांदूळ, 4-5 बीनं बियांची वांगी, तेल अर्धी वाटी, जिरे व धने 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, अर्धी वाटी खोबर्‍याचा कीस, 1-2 वाळलेल्या लाल मिरच्या, मीठ-साखर चवीप्रमाणे, 7-8 काजूचे तुकडे, 1 वाटी सायीचे दही, कढीलिंब, कोथिंबीर व फोडणीचे साहित्य.

vangi bhat
ND
कृती : तांदूळ प्रथम एक ते दीड तास अगोदर धुऊन ठेवावेत. वांग्याच्या साधारण मोठ्या फोटी चिरून पाण्यात मीठ घालून त्यात टाकून ठेवावेत. एक मोठा पातेल्यात किंवा कुकरमध्ये थोडे तेल टाकून कढीलिंब टाकून फोडणी करावी व त्यात धुतलेले तांदूळ व वांग्याचे फोडी चांगल्या परताव्या व तांदूळाच्या दुप्पट उकळीचे पाणी त्यात टाकावे. धने, जिरे पूड लाल वाळलेल्या मिरच्या, खोबऱ्याचे तुकडे, काजूचे तुकडे साधारण बारीक करून त्यात टाकावे. भात शिजत आला की त्यात गरम मसाला, मीठ, साखर घाला.
आणखी
भरल्या कांद्याची भाजी
दुधी भोपळ्याचे धिरडे
मशारूम सँडविच
कॉर्न सॅण्डविच
फणस पनीर कोफ्ता
कॉर्न कटलेट