शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

दह्यातील खमंग धपाटे

ND
साहित्य : 2 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन, पाव वाटी मुगाचे पीठ, 2 लहान चमचे कणीक, जिरेपूड अर्धा चमचा, ओवा पूड अर्धा चमचा, 2 लहान चमचे तीळ, 2 लहान चमचे सुकी कोथिंबीर, भाजण्यासाठी तेल अंदाजे, तिखट, मीठ, हळद अंदाजे, पुदिना पाने वाळलेली पूड अर्धा चमचा.

कृती : वरील पीठ एकत्र करून तिखट, मीठ, हळद घाला, जिरपूड, ओवापूड, कोथिंबीर व पुदिन्याची पूड घाला. दही व थोडे दूध मिक्स करून पीठ भिजवून घ्या. चांगले मळून घ्या. लहान लहान आकारात पोळपाट्यावर धपाटे लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भरपूर तेल लावून भाजून घ्या. धपाटे थंड झाल्यावर डब्यामध्ये पेपर टाकून भरून घ्या. हे धपाटे लोणच्यासोबत छान लागतात.