| | केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे 'जो जे वांच्छिल तो ते लाहो' असाच आहे. शेतकर्यांना कर्जमाफी, नोकरदारांना प्राप्तीकर मर्यादेत वाढ, मध्यमवर्गाला आपल्या घरी असाव्यात असे वाटणार्या वस्तूंवर सवलत, दलित, अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी भरीव रक्कम एवढेच नव्हे तर निधी नाही म्हणून नेहमी आक्रंदन करणार्या ईशान्येच्या राज्यांसाठी भरघोस निधी असे 'ज्याला जे हवे त्याला ते' पद्धतीने वाटप करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. त्याच्या या स्वरूपावरूनच आगामी निवडणुकांचे स्पष्ट संकेतही दिसत आहेत. अर्थात, असे असले तरी 'आम आदमी' मात्र या सार्या बजेटवर जाम खुश झाला आहे......... |