| | मूळचा ऊर्दु शब्द असलेल्या मुजाहिदीनचा अर्थ 'लढवय्या' असा होतो. एका ठराविक उदेशाने धार्मिक युध्द छेडण्याची परवानगी इस्लाममध्ये देण्यात आली आहे. त्यास 'जिहाद' असे म्हटले जाते. त्याचा आधार घेऊन दहशतवादी कारवायांसाठी 'जिहाद'च्या नावाखाली मुस्लिम तरुणांची दिशाभूल करण्याचे काम ही संघटना करते आहे. जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्लीलाही हादरवून सोडणारी 'इंडियन मुजाहिदीन' ही दहशतवादी संघटना 'आयएसआय'च्या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्याचे काम करण्यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्द युध्द पुकारण्यास प्रवृत्त केले जाते |