| | रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. या रंगांमध्ये आरोग्यास घातक अशी रसायने असण्याची शक्यता आहे. यामुळे कॅन्सर, तात्पुरता आंधळेपणा आणि मुत्रसंस्थेच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.
रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. यंदा शनिवारी दि. २२ रोजी हा सण येत आहे. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजली आहेत. पूर्वी होळी म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंग पंचमीचा आनंद द्विगुणीत... |