| | महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकासाला गती खर्या अर्थाने 1970 नंतरच्या काळात मिळाली. 1971 नंतरच्या दहा वर्षात कारखान्यांच्या संख्येत 62 टक्के वाढ झाली. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण हे देशाच्या औद्योगिक धोरणाशी नेहमीची सुसंगत राहिले आहे. औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी नवीन औद्योगिक गुंतवणूक व पायाभूत सुविधांकरिता नवे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाधिष्ठीत सेवा उद्योगांमध्ये गुंतवणूक होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रास सर्वाधिक पसंतीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी शासनाने 2003 साली... |