| |
अमेरिकेतील राजसत्तेने मंगळवारी रात्री कूस बदलली आणि इतिहास घडला. गौरवर्णीयांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बराक ओबामा या कृष्णवर्णीयाने अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अतिशय कसोटीच्या वेळी देशाचे अध्यक्षपद हाती घेतलेल्या ओबामांनी देशावर ओढवलेल्या संकटाची जाणीव ठेवून अमेरिकेचे नवनिर्माण करण्याची घोषणा यावेळी केली. आर्थिक संकटातून देशाची मुक्तता करण्यासाठी आणि अमेरिकेबाहेर आपल्या देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्याला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.....
|