राज्याच्या राजकारणात 2009 या वर्षाने काय दिले? राज आणि उद्धव या ठाकरेंच्या भावकीच्या भांडणात सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने कर्तृत्वशून्य असूनही सत्तेचा लोण्याचा गोळा सलग तिसर्यांदा पटकावला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एक निवडणूक गमावली आणि राज्यातील राजकारणाच्या क्षितिजावर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उदय झाला. या वर्षातील या प्रमुख महत्त्वाच्या घटना.
नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी नवीन आशा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न घेऊन उगविले होते. भारतीय क्रिकेट प्रेमींना सन 2009 कडून खूप अपेक्षा होत्या. आता वर्षाच्या वर्षभरात काय काय घडले याची गोळाबेरीज केली असता 'खूशी जादा, गम कम' असे चित्र क्रिकेटमध्ये दिसते. वर्षभरात भारतीय क्रिकेट संघाने चार 'वन-डे' मालिका जिंकल्या. दोन कसोटी मालिकेत विजय मिळविला. वर्षाच्या अखेरी कसोटीत अव्वल क्रमांकावर मिळविला. कसोटीतील शंभरावा विजय साजरा केला. मात्र टी-20 वर्ल्डकप आणि चॅंपियन्स करंडकमधील पराभव क्रिकेट प्रेमींच्या जिव्हारी लागला. परंतु एकंदरीत वर्ष चांगले राहिले.