मुख्य पृष्ठ > विविध > योग > योगासन
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ब्रह्म मुद्रा

yoga
WD
ब्रह्मदेवाला चार मुख आहेत. त्याच्या नावानेच हे आसन आहे. या आसनात आपण आपली मान चारही बाजूने नेतो, म्हणून याला ब्रह्ममुद्रासन म्हणतात.

कृती- या आसनात आपण पद्मासन, सिद्धासन वा वज्रासन यापैकी कोणत्याही स्थितीत बसू शकता. कंबर व मान सरळ रेषेत हवी. त्यानंतर मान हळूहळू उजव्या बाजूला न्यावी. तेथे थोडावेळ थांबावे. नंतर मान हळू हळू डाव्या बाजूला न्यावी. तेथे पुन्हा थोडे थांबावे. मग पुन्हा उजवीकडे न्यावी. त्यानंतर परत आल्यानंतर मान वर न्यावी आणि नंतर खाली न्यावी. अशा तर्‍हेने एक चक्र पूर्ण होते. अशी चार ते पाच चक्रे तुम्ही करू शकता.

सूचना- ब्रह्म मुद्रा करताना पाठिचा कणा पूर्ण ताठ हवा. मान डाव्या व उजव्या बाजूला नेण्याची गती सारखी हवी. यात घाई करू नका. हनुवटीला खांद्याच्या दिशेने न्या..

yoga
WD
स्पॉंडायलिटीस वा थॉयराईडचा त्रास असणार्‍यांनी हनुवटी वरच्या दिशेने न्या. मान खाली करत असताना खांदे झुकवू नका. कंबर, मान व खांदा सरळ ठेवा. मान वा गळ्यात काही गंभीर रोग असल्यास योग तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

फायदा- ज्या लोकांना स्पॉंडिलायटिस वा थॉयराईडचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. मान लवचिक होतानाच मजबूतही होते. अध्यात्मिक दृष्टिकोनातही हे आसन फायदेशीर आहे.
व्हिडिओ पाहा
आणखी
पश्चिमोत्तनासन  
उष्ट्रासन  
वक्रासन  
अर्धमत्स्येन्द्रासन  
मत्स्यासन  
सुप्त वज्रासन