देशापुढे आज वाढता चलनवाढीचा दर ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. हा दर नियंत्रणात आणण्याचे काम जरी सरकारचे असले, तरी देशातील उद्योग त्यांना या कामात सहकार्य करतील असे आश्वासन सीआयआयचे नूतन अध्यक्ष के व्ही कामत यांनी सरकारला दिले आहे.
भारतीय उद्योग परिसंघ अर्थात सीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर ते प्रथमच सीआयआयच्या सदस्यांना संबोधीत करत होते.
देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आज घडीला अनेक समस्या आहेत. यात इंधनांचे वाढते दर, उत्पादनांच्या वाढत्या किंमती, प्राथमिक सुविधांचा अभाव, वाढती महागाई यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.
या सर्वांचे प्रचंड दडपण अर्थव्यवस्थेवर पडत असून, सरकारला यात हवी ती मदत करण्यास सीआयआय तयार असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.
|