अनिल अंबानी उद्योग समूहातील रिलायंस पावर लिमिटेडने इंडोनेशियातील तीन कोळसा खाणी अधिग्रहीत केल्या आहेत. या खाणींची क्षमता दोन बिलियन मेट्रीक टन एवढी आहे. समूहातील उद्योग रिलायंस कोल रिर्सोसेस लिमिटेडने हे अधिग्रहन केले आहे.
उद्योग खाण व संबंधीत वाहतूक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी चोवीसशे कोटीची गुंतवणूक करणार आहे. यामुळे खाणींची क्षमता पंचवीस मिलियन मेट्रीक टन प्रतिवर्ष एवढी होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
|