वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना चर्ककार, लोहार, धोबी यासारखा पारंपरिक व्यवसाय करणार्या व्यक्तींना अल्प व्याजदरात कर्जपुरवठा करण्याचा आदेश दिल्याचे स्पष्ट केले.
सुमारे सत्तर हजार बँकांना चार टक्के व्याजदरावर पाच हजार रूपयांचे कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. श्रमिकांच्या यादीत मच्छीमार व गुराखी यांचाही समावेश झाल्यास त्यांनाही कर्ज देता येईल, असे स्पष्ट केले.
समाजातील या घटकांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, खेड्याची अर्थव्यवस्था त्यांच्यावरच अवलंबून आहे. या घटकाकडून कर्जाची परतफेड होणार नाही याबाबतची चिंता फेटाळून लावताना पोलाद उद्योगाचे 12000 हजार कोटी रूपये माफ करण्यात येते असताना छोट्या रकमेबाबत भीती बाळगणे तार्किक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|