एअरटेलने काही दिवसांपूर्वी आपल्या दरात कपात केल्यानंतर आज देशातील आणखी एक महत्त्वाची मोबाईल सेवा पुरविणार्या व्होडाफोन या कंपनीने आपल्या एसटीडी दरात कपात करत असल्याची घोषणा केली.
कंपनीने रोमींग दरातही कपात केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार रोमींग दरात एक रुपये तर एसटीडी दरात दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे.
|